मंडळाची सुरुवात
सन्नी मित्र मंडळाची स्थापना 1992 साली झाली. स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात मंडळाने छोटे-छोटे उपक्रम राबवून परिसरातील लोकांना आपल्या सण-उत्सवात सहभागी करून घेतले. आमचे उद्दिष्ट एकच होते – आपली मराठी संस्कृती टिकवून ठेवणे, सण-उत्सव लोकांपर्यंत पोहोचवणे आणि परिसरातील लोकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.
कल्याणचा इच्छापूर्ती
2008 पासून आम्ही माघी गणेश जयंती उत्सव साजरा करतो. त्यावेळी एकत्रित नवस केल्यानंतर गणपती बसवण्यात आले, आणि हळूहळू अनेकांचे नवस पूर्ण होऊ लागले. त्यामुळे लोक आम्हाला “इच्छापूर्ती बाप्पा” म्हणून ओळखू लागले आणि मंडळाला “कल्याणचा इच्छापूर्ती” हे नाव मिळाले. हा उत्सव पर्यावरण पूरक असून पर्यावरण वाचवण्याचा संदेश दरवर्षी दिला जातो.
आमचे उपक्रम
माघी गणेश जयंती मध्ये आम्ही सत्यनारायण महापूजा,बक्षीस समारंभ, भंडारा, हळदी कुंकू पर्यावरणपूरक सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच चित्रकला, रांगोळी आणि कॅरम स्पर्धा आयोजित करतो. या उपक्रमांमुळे परिसरातील लहान मुलं, युवक आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.
📸 आमच्या स्पर्धांचे व उपक्रमाचे खास क्षण ( २०२५ )
श्रींच्या आगमनाचे खास क्षण
सत्यनारायणाची महापूजा व भंडारा
कॅरम स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि बुद्धिबळ स्पर्धा
बक्षीस समारंभ आणि हळदी कुंकू
श्रींच्या विसर्जनाचे खास क्षण
दिवाळी विशेष - शिवकालीन किल्ले व त्यांचा इतिहास
सन्नी मित्र मंडळाचे युवा सदस्य तसेच कार्यकर्ते, दिवाळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आकर्षक किल्ला तयार करतात व त्याबाबत माहिती देतात.